Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आझादी का अमृत महोत्सव निमित्त दिनांक 18 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत आरोग्य मेळाव्याचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि.13 एप्रिल : आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र मुंबई यांचे पत्र दिनांक 21 मार्च 2022 आझादी का अमृत महोत्सव साजरा करणेचा भाग म्हणून दिनांक 18 एप्रिल ते 22 एप्रिल, 2022 या कालावधीत प्रत्येक तालुका स्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्याबाबतचे निर्देश आहेत त्यानुसार प्रत्येक तालुका स्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

आरोग्य मेळाव्याच्या आयोजनाची उदिष्टे 1) विविध आरोग्य आणि कुटूंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरुकता निर्माण करणे.उदा.आयुषमान भारत हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर्स,व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2) उपस्थितांसाठी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत युनिक हेल्थ आयडी तयार करणे 3) पात्र नागरिकांसाठी आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणे 4) विविध संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे व आरोग्य शिक्षण देणे,5) नाविन्यपूर्ण दूरध्वनी,रेडीओ व सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना निरोगी राहणेसाठी वर्तन स्विकारण्यासाठी प्रेरित करणे.6)लवकर आजाराच्या निदानासाठी स्क्रिनींग,औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा आणि आवश्यकतेनुसार संबधितास आरोग्य तज्ञांच्या संदर्भ सेवा प्रदान करणे.
याकरीता भिषक,शल्य चिकित्सक,बालरोग तज्ञ,कान नाक घसा तज्ञ,प्रसुती व स्त्रीरोग तज,दंत चिकित्सक,बधिरीकरण तज्ञांच्या उपलब्ध करुन देण्यात येणार असून,सदर आरोग्य मेळावे सर्व 12 तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत.त्या अनुषंगाने कृती कार्यक्रम तयार करण्यांत आलेला आहे.तसेच सदरहु आरोग्य मेळाव्याचे यशस्वी आयोजनाकरीता तालुका स्तरावर पुढील प्रमाणे समिती स्थापन करण्यांच्या सूचना सर्व वैद्यकीय अधिक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निर्गमीत करण्यांत आलेल्या आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तालुका स्तरीय समिती:- पंचायत समिती सभापती – अध्यक्ष, गट विकास अधिकारी- सह अध्यक्ष, तालुका महिला व बालविकास अधिकारी-सदस्य,तालुका शिक्षणाधिकारी-सदस्य,तालुका समाज कल्याण अधिकारी-सदस्य,तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक -सदस्य सचिव,असे जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन; पुष्करमधे पहिल्याच दिवशी स्नानासाठी भाविकांची गर्दी

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.