Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. 13 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्य सामाजिक समता कार्यक्रमास उपस्थिती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुपारी 12.15 वाजता चंद्रपूर जिल्हा व शहर कमेटीच्या वतीने आयोजित भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्य फुटपाथ विक्रेत्यांना निशुल्क ग्रिष्मकालीन छत्र्यांचे वितरण कार्यक्रमास उपस्थिती.  दुपारी 12.45 ते 1 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1 वाजता चंद्रपूर येथुन सिंदेवाहीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव.

दुपारी 2.15 वाजता वनविभाग सभागृह, सिंदेवाही येथे उपवनसंरक्षक ब्रम्हपूरीच्या वतीने आयोजित डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेंतर्गत प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बौद्ध विहारास भेट. तदनंतर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्य फुटपाथ विक्रेत्यांना निशुल्क ग्रिष्मकालीन छत्र्यांचे वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.45 वाजता पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय, सावली येथे आगमन.सायंकाळी 6 वाजता सावली येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्य आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता भूज ता.ब्रम्हपूरी येथे आगमन व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्य आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9 वाजता भूज येथून ब्रम्हपूरी प्रयाण.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शूक्रवार दि.15 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7 वाजता ब्रम्हपूरी येथून आदिलाबाद तेलंगणा राज्याकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, आदिलाबाद (तेलंगणा राज्य) येथे आगमन. सकाळी 11.30 वाजता संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडील लग्न सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.30 वाजता दुर्गा माता मंदिर पटांगण, कृष्णानगर मुल रोड येथे जिल्हास्तरीय पालकमंत्री महिला व पुरुष कबड्डी सामने उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

हे देखील वाचा : 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन; पुष्करमधे पहिल्याच दिवशी स्नानासाठी भाविकांची गर्दी

 

 

 

 

Comments are closed.