Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा फुले जयंतीदिनी सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे बार्टीच्या समतादुतांद्वारा आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

नाशिक, दि. १३ एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेळगाव ढगा या ठिकाणी समतादुतांद्वारा करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नम्रता इंगळे यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमप्रसंगी त्रंबकेश्र्वर तालुक्याचे समतादूत सुजाता वाघमारे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकुत स्त्री शिक्षणाचे महत्व योगदान किती मोलांचे होते यांची अनुभूती करून दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेकर यांनी भारतीय संविधानात स्त्रीयांना  दिलेले मूलभूत अधिकार यांची ओळख माहिती विश्लेषणात्मक करून देवुन  बार्ट्टी व समाज कल्याण योजने विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे संचालन अशोक गांगुर्डे यांनी करीत शेवटी आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, लहान मुले, महिला वर्ग व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती प्रामुख्याने होती.

हे देखील वाचा : 

पुष्करमधे पहिल्याच दिवशी स्नानासाठी भाविकांची गर्दी

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

 

Comments are closed.