Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारत – पाकिस्तान मधील मच्छीमार बांधवांच्या व्यथा सांगणारा ‘क्या पानी मे सरहद होती है.?’ माहितीपट पालघरवासियांच्या भेटीला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर दि, १३ एप्रिल : भारत आणि पाकिस्तान दरम्यान चा अरबी समुद्र दोन्हीकडील मच्छिमार मासेमारी करत असतात माशांच्या शोधात खोल समुद्रात जातात आणि सागरी सीमा पार केल्याच्या आरोपाखाली पकडले जातात यावर तयार करण्यात आलेल्या ‘क्या पानी मे सरहद होती है ‘ हा माहितीपट पालघर येथे मच्छिमार व इतरांना दाखविण्यात येणार आहे, इच्छुकांनी हा विनामूल्य शो पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मच्छिमार संघटनांनी केले आहे

भारत आणि पाकिस्तान दरम्यान चा अरबी समुद्र दोन्हीकडील मच्छिमार मासेमारी करत असतात माशांच्या शोधात खोल समुद्रात जातात आणि सागरी सीमा पार केल्याच्या आरोपाखाली पकडले जातात यामध्ये मुख्यतः गुजरातमधील आणि काही प्रमाणात पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समावेश आहे शिक्षा पूर्ण करूनही वर्षानुवर्षे एकमेकांच्या तुरुंगात सडत राहत असतात प्रसंगी तिथे मृत्यू पावतात त्यांच्या कुटुंबीयांना असावे पण या त्यांच्या स्वतःची वाट पाहत राहतात अलीकडेच पालघर जिल्ह्यातील कोथळी गावातील श्रीधर सांबरे या मच्छीमारांचा पाकिस्तानी गोळीबारात निधन झाले होते

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारत-पाकिस्तान समुद्रातील सीमावाद नक्की काय आहे याबाबत लोकांमध्ये माहिती करून देण्यासाठी सदर विषयाबाबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व दोन्ही देशात मधील गरीब मच्छिमारांच्या बाबत धोरण मानवी हक्काचे अधिक सुसंगत होण्यासाठी संतोष कोल्हे यांनी प्रत्यक्ष गुजरात व दिवच्या किनारपट्टीवर जाऊन मच्छीमार, बोट मालक, मच्छीमार कार्यकर्ते यांच्याशी बोलून तसेच प्रत्यक्ष बोटीवर जाऊन क्या पानी मे सरहद होती है हा माहितीपट तयार करण्यात आला आहे ही शॉर्ट फिल्म शो मच्छीमारांना माहितीसाठी शुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पालघर येथील ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाच्या सभागृहात दाखविण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमावेळी पाकिस्तान इंडिया पीस फोरमचे कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई व माहिती पटाचे दिग्दर्शक संतोष कोल्हे हे उपस्थित मच्छीमारांची संवाद साधणार आहेत सदर कार्यक्रम हा ठाणे जिल्हा मच्छीमार संघ मर्यादित व ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी ही शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघ यांनी संयुक्तरीत्या केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

महात्मा फुले जयंतीदिनी सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे बार्टीच्या समतादुतांद्वारा आयोजन

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन; पुष्करमधे पहिल्याच दिवशी स्नानासाठी भाविकांची गर्दी

 

 

Comments are closed.