Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी तालुक्यात मतदान कार्डला आधार जोडणीबाबत प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि.05 सप्टेंबर :- मुख्य निवडणूक अधिकारी ,महाराष्ट्र यांचे पत्रानुसार मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करणेसाठी ऐच्छीक तत्वावर मतदारांकडून आधार तपशील गोळा करणेकरीता प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्याचा सुचना दिल्या आहेत. मासिक विशेष शिबीराचे आयोजनासंबंधी रविवार दिनांक 11 सप्टेंबर ही तारीख निश्चित करुन दिली आहे. त्याअनुषंगाने अहेरी तालुक्यात एकूण 93 मतदान केंद्र असून मतदारांकडून अधिक प्रमाणात आधार तपशील गोळा करणे व लोकसहभाग साध्य होण्याचे दृष्टीने दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सर्व मतदारांनी संबंधित मतदान केंद्रावर भेट देऊन आधार तपशील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी,ओंकार शेखर ओतारी यांनी केले आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेनेला शिक्षा झाली पाहिजे… अमित शाहांचा शिवसेनेवर हल्लाबोल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेकापचा दणका : गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.