Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मॉडेल प्रिझन्स ऍक्ट लवकरच…

सर्व राज्य सरकारांना सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05, सप्टेंबर :- सर्व राज्य सरकारांनी ,२०१६ मध्ये केंद्र सरकारने सादर केलेल्या मॉडेल प्रिझन मॅन्युअलचा ताबडतोब स्वीकार करावा, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल केले.

कारागृहांबद्दलच्या आमच्या मतांचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज असून तुरुंगातील सुधारणा गतिमान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तुरुंग नियमावलीनंतर, आम्ही आता मॉडेल प्रिझन्स ऍक्ट आणणार आहोत, यामुळे ब्रिटिश काळापासून लागू असलेल्या कायद्यात आवश्यक ते बदल घडून येतील. सध्या आम्ही राज्यांशी व्यापक चर्चा करत आहोत आणि मला खात्री आहे की तो कायदा येत्या सहा महिन्यांत अमलात आणला जाईल. देशातील तुरुंगांना अत्याधुनिक बनवण्यासाठी मॉडेल प्रिझन्स ऍक्ट आणणार आहोत, असे शाह म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्र सरकार येत्या सहा महिन्यांत ब्रिटिशकालीन कायद्यांत सुधारणा करून प्रारूप कारागृह (मॉडेल प्रिझन) कायदा आणणार असून त्यासाठी राज्य सरकारांशी सविस्तर चर्चा सुरू आहे, असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहेरी तालुक्यात मतदान कार्डला आधार जोडणीबाबत प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन.

शिवसेनेला शिक्षा झाली पाहिजे… अमित शाहांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Comments are closed.