Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“बार्टी” तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संपुर्ण राज्यात ५  ते २० जून दरम्यान वृक्षारोपण पंधरवडा  साजरा केला जात आहे.

त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील समतादूत सुजाता वाघमारे यांनी नाशिक जिल्ह्यातील शांळा तसेच सदरच्या तालुक्यातील विविध गावात वृक्षारोपण केले. यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने फळझाडे-आंबा, चिक्कु, चिंच, उंबर सिताफळ औषधी-अडुळसा तसेच जंगली वनस्पती-वड, पिंपळ, बेहडा, बावा अशा एकत्रित ६१ प्रकारच्या वनस्पतींच्या सहभाग होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमास लहान मुले, ग्रामस्त, सरपंच, ग्रामसेवक आदींचे सहकार्य लाभले. संबंधित  वृक्षारोपणाकरिता तालुक्यातील तळेगाव, अंजनेरी आश्रम, पेगलवाडी, खंबाळे, तळवाडे, रतनपाडा, पिंम्पी तसेच नाशिक येथिल कन्या कोठारी शाळां आदींचा समावेश होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी सध्याच्या काळात वृक्षांची असणारी गरज व संबंधी महत्वपूर्ण फायदे पटवुन देत सदर लागवड केलेल्या वृक्षांची देखभाल, काळजी संबंधी मार्गदर्शन केले. एकंदरीत बार्टीच्या या महत्वपुर्ण उपक्रमामुळे विविध स्तरावरुन बार्टीचे कौतुक होत आहे.

हे देखील वाचा :

‘मिहान’ मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे उद्योग संमेलनाचे आयोजन करा : नितीन राऊत

नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी ई-गव्हर्नन्स आधारित कार्यपद्धती वापरावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गोसेखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी आंतरराज्यसह सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.