Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आमचीही स्वबळाची तयारी सुरु, भविष्यातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या पटोले यांच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

जालना :  येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, नगर परिषद निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढेल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. यावर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसने निवडणूक कशी लढायची हा त्यांचा प्रश्न असून आमचीही पालिका निवडणूक स्वबळावर लढायची तयारी सुरु असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय. काँग्रेसला मुख्यमंत्री पद हवं असेल तर त्यांना सर्वाधिक जागा निवडून आणाव्या लागतील मात्र भविष्यात देखील शिवसेनेच्याच सर्वात जास्त जागा निवडून येणार असुन उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री असतील असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जालन्यात आज शिवसेनेचा वर्धापन दिन आणि पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिवसेनेच्या वतीने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कपाशी बियाणे आणि प्रत्येकी ७ हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या मदतीचं वाटप करण्यात आलं. यावेळी जालना जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना नेते लक्ष्मण वडले, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

‘मिहान’ मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे उद्योग संमेलनाचे आयोजन करा : नितीन राऊत

नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी ई-गव्हर्नन्स आधारित कार्यपद्धती वापरावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments are closed.