Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजने अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करणेबाबत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 25 नोव्हेंबर :-  राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक ठिंबकव तुषार सिंचन बसविण्यासाठी शेतक-यांना महाडीबीटी प्रणालीपर अर्ज नोंदणी करणेकरिता आवाहन करण्यात येते आहे.

योजनेचे वैशिष्टये- महाडीबीटी संकेतस्थलावरुन २४x७ अर्ज प्रक्रिया सुरु संपुर्ण प्रक्रिया आँनलाईन असुन हार्ड काँपी सादर करण्याची आवश्यकता नाही. पारदर्शी आँनलाईन सोडत पध्दत ५ हेक्टर पर्यत लाभ मर्यादा शेतक-यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये अनुदान थेट जमा होते. केद्राच्या सुधारीत खर्च मर्यादेप्रमाणे सर्व पिकांसाठी अनुदान अपलब्ध .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

• अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांसाठी
राष्ट्रीय कृषि विकास योजना -प्रति थेंब अधिक पिक घटक व बिरसा मंडा कृषि क्रांती योजना मिळुन सुक्ष्म सिंचन संचासाठी ९० टक्के पर्यत अनुदान देय आहे.

• अनुसूचित जाती प्रवर्गातील व नवबौध्द शेतक-यांसाठी
राष्ट्रीय कृषि विकास योजना -प्रति थेंब अधिक पिक घटक व डाँ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना मिळुन सुक्ष्म सिंचन संचासाठी ९० टक्के अनुदान देय आहे. ठिबक व तुषार सिंचन संचासाठी देय अनुदान शेतकरी वर्गवारी राष्ट्रीय कृषि विकास योजना -प्रति थेंब अधिक पिक मुख्यमंत्री शाश्र्वत कृषि सिंतन योजना एकुण अल्प व अत्यल्प भुधारक ५५% २५% ८०% बहु भुधारक ४५% ३०% ७५% शेतकरी वर्गवारी राष्ट्रीय कृषि विकास योजना -प्रति थेंब अधिक पिक डाँ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना/ बिरसा मंडा कृषि क्रांती योजना एकुण अल्प व अत्यल्प भुधारक ५५% ३५% ९०% बहु भुधारक ४५% ४५% ९०% अधिक माहीतीसाठी कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारी/उपविभागीय कृषि अधिकारी/ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच आँनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या हस्ते गुरवळा नेचर सफारी चा शुभारंभ !

जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे तर्फे श्रीमती कमलाताई मुन्घाटे विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जनजागृती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.