Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वेबसाईटवरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक चेंबूर पोलिसांची लक्षणीय कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 25 नोव्हेंबर :- प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, एक इसम त्याचे साथीदारांसह Tracenow.co.inwww.fonivotech.com अशा नावाच्या दोन वेबसाईट विकसित केल्या असून, त्या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून तो महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात राज्यातील नागरीकांची त्यांचे नावावरून किंवा आधारकार्ड लिंक मोबाईल क्रंमाकावरून त्यांचे संपूर्ण नाव, गाव, पत्ता सर्व जुने बंद झालेले व चालू असलेले मोबाईल क्र., ई मेल आय. डी., जन्म तारीख, कुटुंबातील सदस्य त्यांची माहिती, त्यांचे आधारकार्ड लिंक मोबाईल नंबर याबाबत इंत्यभुंत माहिती मिळते.

नमूद वेबसाईट वरून कशाप्रकारे माहितीची देवाण घेवाण होते किंवा खरेदी विक्री होते यादृष्टीने अभ्यास करून, तांत्रिक विश्लेषण व गोपीनीय पध्दतीने सातत्याने सलग दोन माहिने प्रयत्न करून, आरोपी इसमाचे कार्यालय व निवासस्थान याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यावरून आरोपी इसमाचे कार्यालय व निवासस्थान याठिकाणी निगराणी ठेवण्यात येत होती. दरम्यान पोलीस पथकाने त्यादृष्टीने अधिकाअधिक प्राथमिक पुरावाआणि इतरही गोपनीय माहिती संकलित करून पुराव्याच्या आधारावर दिनांक २३/११/२०२२ रोजी चेंबूर
पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करून, पोलीसांची दोन पथके तयार करून एकाच वेळी आरोपीचे कार्यालय व राहते निवासस्थानी छापा टाकून तेथून सर्व संगणक, लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड पंचनामा करून हस्तगत करून त्यामधून संगणकिय डाटा संकलित केला आहे. या गुन्ह्यात दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून दिनांक २४/११/२०२२ रोजी मा. न्यायालया समक्ष रिमांड कामी हजर केले असता, मा. न्यायालयाने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून आरोपींना १२ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर गुन्हयाचा पुढील तपास
कक्ष ६ कार्यालयातील पोलीस निरीक्षक प्रशांत पवार करीत आहेत. सदरची कारवाई ही मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री सुहास वारके सो, मा. पोलीस उप आयुक्त, श्री. संग्रामसिंह निशाणदार सो, श्री कृष्ण कान्त उपाध्याय सो व मा. सपोआ (डी पुर्व), चंद्रकांत जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पो.नि. प्रशांत पवार,पो. नि. एच. एम. ननावरे, स.पो.नि. सचिन गावडे, स. पो. नि. मिरा देशमुख, पोलीस उप निरीक्षक रामदास कदम / कक्ष ७, पोलीस उप निरीक्षक सुभाष मुठे, पोलीस उप निरीक्षक संदिप रहाणे, पोलीस उप निरीक्षक नंदकुमार बेळणेकर, स.फौ. २७५३५/सावंत, स.फौ. २७८७१/आव्हाड, स.फौ.क्र. २९३६१ / देसाई, पो.ह.क्र. ३१९५६/पारकर, पो.ह.क्र. ९७०५४२/भिलारे, पो.ह.क्र. ९८०६९७ / तुपे, पो.ना.क. ०४०३६३ / शिंदे, पो.ना.क.०४११३२/गायकवाड,
पो.ना.क्र.०३१००८/वानखेडे, पो.ना.क्र.०५०७४२/मोरे, पो.ना.क.०६१२९४/आराख, पो.शि.क्र.०६१७०३/ घेरडे, पो.शि.क्र.०७०४००/भालेराव, पो.शि.क्र.०७०७७४/माळवेकर, पो.शि.क्र. ०८०२९६ / कोळेकर, पो.शि.क्र.०८०३३९/इंगळे, पो.शि.क.०९०६६४/ चव्हाण, पो.शि.क्र.०९०३१९७/पवार, पो.शि.क्र.०११०६४१/ शेख, म.पो.शि.क्र. ०७११९३ – दळवी / कक्ष ७, म.पो.शि. ०९०२०५५/सरोदे, पो.ना.चा.क्र. ९८०७६५/डाळे, पो.ना.चा.क्र. ०३१५२४/जायभाये आणि पो.शि.चा. क्र. १७१३६५/पाटील यांचे पथकाने पार पाडली.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे तर्फे श्रीमती कमलाताई मुन्घाटे विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जनजागृती

प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजने अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करणेबाबत

Comments are closed.