Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

30 डिसेंबरला होणार चित्रपट रिलीज

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  26, ऑक्टोबर :-  रितेश देशमुख आणि जेनेलिया चा आगामी चित्रपट ‘वेड’ च्या पोस्टरचे अनावरण पाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला आहे. पोस्टर शेअर करत रितेशने एक लक्षवेधी कॅप्शन ही लिहिले आहे. ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फस्ट लुक. आमच वेड तुमच्यापर्यंत येत आहे 30 डिसेंबरला. तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असू द्या’ असे रितेश ने म्हटले आहे.

‘वेड’ चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश ने केले असून रितेश आणि जेनेलिया मुख्य भुमिकेत दिसणार आहे. वेड चित्रपटातून अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. खुप काळानंतर जेनेलिया मोठ्या पडद्यावर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. आता दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पुन्हा पहावयास चाहते कमालीचे उत्सूक आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ही गुडन्यूज शेअर करत रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या चाहत्यांना एक खास असे दिवाळी भेट दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

आयसीसीने टी-20 साठी नवी रॅंकिंग जारी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोदी सरकार जातीयवादी आणि धर्मांध

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.