Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकत्रित होऊन येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाऊन काम करूया

मल्लिकार्जुन खरगे यांचा संदेश, मल्लिकार्जुन खरगे यांनी स्विकारला कांग्रेस अध्यक्षपदाचा पदभार, काॅंग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर :- तब्बल २४ वर्षानंतर गांधी परिवाराव्यतिरिक्त अध्यक्षपद गांधी परिवारातील नसलेल्या व्यक्तीकडे आले आहे. अध्यक्षपदावर निवड झाल्याचे अधिकृत पत्र पक्षाचे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना सोपविले. दिल्लीत काॅंग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगे यांनी वरिष्ठांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला. काॅंग्रेस पक्षाच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून देत एकत्र येत काम करण्याचा संदेश त्यांनी दिला. एकापाठोपाठ एक निवडणूकीतील पराभव आणि सातत्याने कमी हो जाणारा जनाधार अशा स्थितीत अध्यक्ष बनलेल्या खरगे यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. आता खरगे अध्यक्ष झाल्यानंतर काॅंग्रेसला कितपत फायदा होणार हे पाहावे लागले.

१९९८ पासून काॅंग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोनिया गांधी संभाळत होत्या. २०१७ नंतर दीड वर्षाचे राहुल गांधीचे अध्यक्ष पद सोडले तर जवळपास २४ वर्षे त्यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यामुळे खरगे यांनी पदभार स्विकारल्यानंतर भार हलका झाल्याच्या भावना सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात करत खरगे पक्षाला नवीन उभारी देतील असा विश्वास व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यानंतर आता लवकरच काॅंग्रेसच्या संघटनात्मक रचनेतही बदलांचे संकेत आहेत. आज काॅंग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांनी, काॅंग्रेस महासचिव, प्रभारींनी आपापले राजीनामे मल्लिकार्जून खरगे यांना सादर केलेे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.