Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयसीसीने टी-20 साठी नवी रॅंकिंग जारी

विराट कोहलीने मिळवले टाॅप टेन मध्ये स्थान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 26, ऑक्टोबर :-  बुधवारी आयसीसीने टी-20 साठी नवीन रॅंकिंग घोषीत केली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान पहिल्या स्थानावर आहे तर टीम इंडियाचा सुर्यकुमार यादव एका स्थानाने मागे आला आहे. तो तिसर्या स्थानी असून न्यूझीलॅंडचा डेवोन काॅन्वे दुसर्या स्थानी आहे. पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम चैथ्या तर दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम पाचव्या स्थानी आहे.

आयसीसीने टी-20 नवीन रॅंकिंग मध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने टाॅप टेन मध्ये स्थान मिळविले आहे. फलंदाजीमध्ये 35 व्या क्रमांकावरून झेप घेत विराट टाॅप टेन मध्ये पोहचला आहे. त्याला रॅंकिंग मध्ये 9 वे स्थान प्राप्त झाले आहे. पाकिस्तानविरूध्द झालेल्या मैच मध्ये नाबाद 82 धावांची धडाकेबाज फलंदाजी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काही महिन्यांपूर्वी विराटकडून निराशजनक कामगिरी होत असल्याने त्याच्यावर टीका होत होती. त्यामुळे तो क्रमवारीत 35 व्या क्रमांकावर गेला होत. मात्र आॅगस्टमध्ये महिन्याभराची विश्रांतीनंतर परतलेलया विराट ने परत एकदा धडाकेबाज फलंदाजी करून दोन महिन्यातच त्याने टाॅप टेन मध्ये स्थान मिळवले आहे.

गोलंदाजीच्या क्रमवारी भुवनेश्वर कुमार ने टाॅप टेन मध्ये स्थान मिळविले आहे. दोन अंकांनी झेप घेत तो 10 व्या स्थानावर पोहचला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पंड्याने तीन अंकाची झेप घेत तिसर्या स्थानावर पोहचला आहे तर बांग्लादेशचा कर्णधार अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल ठरला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Comments are closed.