Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करण्याची गरज नसल्याची शरद पवारांची भूमिका स्वागतार्ह

कृषी कायद्यांत दुरुस्ती करण्यास केंद्र सरकार तयार असल्याने शरद पवार यांनी शेतकरी नेत्यांचे मन वळवून आंदोलन स्थगित करावे - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क दि. 3 जुलै : केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांतील आक्षेपार्ह बाबी शोधून त्या काढून टाकल्या पाहिजेत मात्र सरसकट हे कायदे रद्द करण्याची गरज नाही अशी स्वागतार्ह भूमिका घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे. शरद पवार यांनी शेतकरी नेत्यांचे मन वळवून सरसकट कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही तर शेतीला जोडधंदा सुरू केला पाहिजे अशी भूमिका माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी अनेकदा मांडली होती.नवीन कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची तरतूद असल्यामुळे या कायद्याला कुणाचा विरोध होणार नाही असे केंद्र सरकार चे मत होते. मात्र फक्त पंजाब; हरयाणा; राजस्थान आणि झारखंड येथील शेतकरीच या नवीन कृषी कायद्यांना विरोध करीत आहे. कायद्याला विरोध करण्यापेक्षा या कायद्यात ज्या आक्षेपार्ह बाबी असतील त्यात सुधारणा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांनी कृषी कायदे सरसकट रद्द न करण्याची घेतलेली भूमिका स्वागतार्ह असे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आंदोलनाला ही स्थगिती द्यायला पाहिजे होती. मागील 7 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.त्यात शेकडो शेतकऱ्यांचे जीव गेले आहेत.त्याबद्दल शेतकरी नेत्यांना काही सोयरसुतक आहे की नाही ? असा सवाल ना.रामदास आठवले यांनी केला आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अबब… कारच्या डिकीत ७० किलो गांजा

इराणी टॅल्कम पावडरच्या कंटेनर मध्ये आढळलेले २९० किलो हेरॉईन अमली पदार्थ कस्टम विभागाने केले जप्त

४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.