Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इराणी टॅल्कम पावडरच्या कंटेनर मध्ये आढळलेले २९० किलो हेरॉईन अमली पदार्थ कस्टम विभागाने केले जप्त

रायगड जिल्ह्यातील उरणच्या JNPT बंदरावर कस्टमच्या धाडीनंतर धक्कादायक सत्य आले समोर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड : जिल्ह्यातील उरण मधील JNPT बंदरात अनेकदा अवैध मार्गाने आलेल्या वस्तू, पदार्थ कस्टम विभागाने पकडले आहेत. आता कस्टम विभागाला अवैध रित्या आलेले पावडर पकडण्यात खूप मोठे यश आले आहे.

उरणच्या जेएनपीटी बंदराच्या परिसरात सीमाशुल्क/कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत एक धक्कादायक प्रकार समोर आला. याठिकाणी टॅल्कम पावडरचा साठा असलेला एक कंटेनर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर या कंटेनरमध्ये २९० किलो हेरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महसूल गुप्तवार्ता संचलनालय या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेरॉईनची मोठी खेप सागरी मार्गाने भारतामध्ये आणली जाणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती.

त्यानंतर या हेरॉईनचे मुंबई आणि दिल्लीत वितरण करण्यात येईल, अशीही खबर मिळाली होती. या माहितीच्याआधारे कस्टम विभागाने जेएनपीटी बंदराच्या परिसरात कारवाई केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी इराणमधील टॅल्कम पावडरचा एक कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरवण्यात आल्याचे कस्टम विभागाच्या निदर्शनास आले. हा कंटेनर सीएफएसमध्ये (कंटेनर फ्रेट स्टेशन्स) मध्ये ठेवण्यात आला होता. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा कंटेनर उघडून तपासणी केली असता त्यामध्ये अफगाणिस्तानमधून आणलेले २९० किलो हेरॉईन आढळले. हा सर्व साठा कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.

हे देखील वाचा :

४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

..अखेर ‘त्या’ वनमजूरांना मिळाला न्याय; संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाना यश

पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

 

Comments are closed.