Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबब… कारच्या डिकीत ७० किलो गांजा

बोरखेडी येथे पोलिसांनी सापळा रचून टोयाटो कारच्या डिकीत चंद्रपूरमार्गे नागपुरात आलेला ७० किलो गांजा जप्त केला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर : बोरखेडी येथे पोलिसांनी सापळा रचून टोयाटो कारच्या डिकीत चंद्रपूरमार्गे नागपुरात आलेला ७० किलो गांजा पकडला. गुरुवारी दुपारी नागपूर – चंद्रपूर मार्गावर ही कारवाई करण्यात आली.

हा गांजा चंद्रपूर मार्गे नागपूरात येत असल्याची टीप सकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत गुप्त रित्या डी. एल. ७ सी. जी. ४३४१ या कारचा पाठलाग केला. बोरखेडी टोलनाक्यावरून ही गाडी पास झाल्याची माहिती मिळताच पोलिस सक्रिय झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करीत तिला महामार्गावर रोखण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कारची डिकी तपासली असता तीत मोठ्या प्रमाणात गांजा लपवून तस्करी केली जात असल्याचे पोलिसांना दिसले. ग्रामीणचे पोलिस अधिक्षक राकेश ओला, पोलिस अधिक्षक राहूल माकनीकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, उपनिरीक्षक आशिष मोरखेडे यांच्या पथकाने ही सिनेस्टाईल धडक कारवाई केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा गांजा तस्करी करणाऱ्या आस मोहम्मद शकूर (वय २९, रा. विधानपूरा, जिल्हा बागपत, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून जवळपास ३५ पॅकेटमधील ६९ किलो गांजासह १२ लाख ६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी गांजा तस्करीसाठी वापरलेली ५ लाख किमतीची कार, एक मोबाईल आणि रोख एक हजाराची रक्कमही जप्त केली आहे.

हे देखील वाचा :

४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

इराणी टॅल्कम पावडरच्या कंटेनर मध्ये आढळलेले २९० किलो हेरॉईन अमली पदार्थ कस्टम विभागाने केले जप्त

धक्कादायक!! दोन सख्ख्या मावस बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या!

 

 

 

Comments are closed.