Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जाती दावा पडताळणीबाबत निवडणुक उमेदवारांकरीता त्रृटी पूर्ततेकरीता विशेष मोहीम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 20 जानेवारी : जानेवारी 2021 मध्ये निवडणुकीत विजयी झालेले (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र) उमेदवारांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे सादर केलेले आहेत परंतु ज्यांना अद्याप पर्यंत ई-मेल द्वारे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेली नसल्यास सदर प्रस्तावामध्ये जाती दावा सिद्ध करणारे सबळ पुरावे नसल्याने त्यांचे प्रकरण त्रृटीमध्ये असल्याने त्यांना यापुर्वी दुरध्वनी, भ्रमणध्वनी व पत्राद्वारे त्रृटी पुर्तता करणेसंदर्भात कळविण्यात आले आहे.

मात्र ज्या निवडणुक उमेदवारांनी अद्यापही त्यांचे जाती दावे पडताळणी संबंधित आवश्यक ते मानीव दिनांकापुर्वीचे जातीचे व वास्तव्याच्या नोंदीचे पुरावे सादर केलेले नाहीत. अशा निवडणुक उमेदवारांना त्रृटी पुर्ततेकरीता संधी देण्यात येत असून, त्यांनी त्रृटी पुर्ततेबाबत आवश्यक ते पुरावे मुळ प्रतीसह दि. 25 जानेवारी 2022 रोजी मंगळवारला सादर करणेसाठी कळविण्यात आले आहे. त्रृटीपुर्ततेकरीता सबळ पुराव्यासह समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच ज्या उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र तयार होऊनही ज्यांनी अद्याप समिती कार्यालयात जमा असलेली मुळ जात प्रमाणपत्र नेलेले नाही त्यांचे पालक वा सख्खे भाऊ, बहिण यांनी अर्जदाराचे व स्वत:चे ओळखपत्र (मुळ व झेरॉक्स), जात वैधता प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन तात्काळ मुळ जात प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसं,कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्ता तर अहेरीत त्रिशंकू

गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीचे निकाल जाहीर

नक्षलग्रस्त जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष बाब म्हणून अधिकचा निधी देवू : उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.