Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करणार – मुख्यमंत्री

विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत पोलिसांचा कयास.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 14 ऑगस्ट :-  शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे, या अपघाताची चौकशी करण्यात येईल असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे असे म्हणाले की, “मला ते ३-४ दिवसांपूर्वीच भेटले होते. या वृत्तावर माझाही विश्वास बसला नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने ते संघर्ष करत होते. त्यांनी अनेक आंदोलनं केली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचेही ते अध्यक्ष होते. मला ते ३-४ दिवसांपूर्वीदेखील भेटले होते. त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघं आहात. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल. आज आम्ही एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. पण दुर्दैवाने त्यांचं दु:खद निधन झालं आहे. सरकार त्यांच्या परिवारासोबत आहे. विनायक मेटेंच्या पत्नीवरदेखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे”, अशा संवेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत पोलिसांचा कयास

विनायक मेटे दुसऱ्या रांगेतील सीटवर बसले होते. पोलीस सुरक्षारक्षक पुढे बसला होता. मेटेंच्या कार चालकाने थर्ड लेनमधून मध्यल्या लेनमध्ये येण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच ट्रकचालकही लेन बदलत होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मेटेंची गाडी वेगाने असल्याचा संशय असून चालकाला गाडी कंट्रोल झाली नाही. यामुळे गाडी डाव्याबाजुने ट्रकवर आदळली. एअरबॅग उघडली, मेटे मागे झोपले होते. अचानक पुढे आदळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर दहा टायरचा ट्रक थांबला नाही, चालक ट्रक घेऊन पळून गेला आहे.

हे देखील वाचा :-

शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांचं अपघाती निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.