Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांचं अपघाती निधन

पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

मुंबई, दि. १४ ऑगस्ट :-  मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे (१४ ऑगस्ट) दुर्दैवी निधन झालं आहे. विनायक मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मेटे यांच्या गाडीने पुढे जाणाऱ्या गाडीला जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान या अपघातात मेटेंना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला होता. त्यांना तात्काळ नवी मुंबईतील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले,परंतु उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विनायक मेटे हे शिव संग्राम पक्षाचे नेते होते. त्यांचा जन्म ३० जून १९७० रोजी बीड जिल्ह्यात झाला होता. २०१६ साली ते भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेत आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले होते. मराठा आरक्षण तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात भव्य स्मारक व्हावे यासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा:- 

 

Comments are closed.