Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रेमीयुगलाने केली आत्महत्या..

उत्तर सोलापूर तालुक्यातील बी बी दारफळ गावातील प्रकार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापुर,13, सप्टेंबर :- आमचं प्रेम समाजाला मान्य नाही अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. बीबीदारफळ येथील गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला.

या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी ७ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरविले त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी पूर्वी दोघांनीही स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत, त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राजाराम खांदला येथील शेतकरी व आविस पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट

विरोधकांचे काम टिका करण्याचे; आमचा एजेंडा विकासाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.