Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तालुकास्तरीय बालसंगोपन शिबीरात 524 प्रकरणे निकाली.

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांचा स्तुत उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 13,सप्टेंबर :- जिल्हा महिला व बाल विकास विभागाव्दारे 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराश्रीत, बेघर, कुष्ठरूग्ण,व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदयाची बालके,एच.आय.व्ही.ग्रस्त/बाधीत बालके,अन्य प्रकारे आपत्तीत असलेले बालकांचे संस्थात्मक आणि कौटुंबिक वातावरणात संगोपण व्हावे,यादुष्टीने बालसंगोपन योजनेचा लाभ दिल्या जाते.गरजु मुलांची निवड करून, बाल कल्याण समीतीसमोर मुलांना हजर करणे आवश्यक आहे. बाल कल्याण समीतीच्या मान्यते शिवाय बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देता येत नाही.
त्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली कार्यालयाअंर्तगत बालसंगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींची संख्या सदयास्थितीत 499 असून यामध्ये वाढ होवून 333 नविन असे एकुण 832 लाभार्थ्यांना समीतीसमोर सादर करावयाचे होते. परंतु 832 लाभार्थी हे वेगवेळ्या तालुक्यातील असल्याने त्यांना गडचिरोली येथे समीती समक्ष येणे शक्य नसल्याने तसेच लाभार्थ्यांची गैरसोय होता कामा नये त्यामुळे जिल्हा बाल संरक्षण कक्ष,व बाल कल्याण
समीती याच्या पुढाकाराने तालुकाच्या ठिकाणी तालुकानिहाय लाभार्थी बालकांना समीती समक्ष बालकांना सादर करण्याकरिता दिनांक 06 सप्टेंबर 2022 ते 12 सप्टेंबर 2022 ला गडचिरोली, आरमोरी, वडसा, कुरखेडा, तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील शिबीरात कार्यालयीन बालसंगोपन लाभार्थी 72 बालकांना समीती समक्ष सादर करण्यात आले. तसेच आरमोरी तालुक्यातील शिबीरात स्वयंसेवी संस्थेचे बालसंगोपन लाभार्थी एकुण 93 बालकांना समीती समक्ष सादर करण्यात आले. तसचे वडसा तालुक्यातील शिबीरात कार्यालयीन बालसंगोपन लाभार्थी 67 बालके तसेच स्वयंसेवी संस्थेचे 60 बालके एकुण 127 बालकांना समीती समक्ष सादर करण्यात आले. कुरखेडा तालुक्यातील शिबीरात कार्यालयीन बालसंगोपन लाभार्थी 82 बालके तसेच स्वयंसेवी संस्थेचे 93 बालके एकुण 175 बालकांना समीती समक्ष सादर करण्यात आले. तसेच चामोर्शी तालुक्यातील शिबीरात कार्यालयीन बालसंगोपण लाभार्थी 57 बालके समीती समझ सादर करण्यात आले. सदरउपक्रम जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, प्रकाश भांदककर, व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.यावेळी बाल कल्याण समीतीचे अध्यक्ष वर्षा मनवर,बाल कल्याण समीतीचे सदस्य डॉ.संदीप लांजेवार, सदस्य काशीनाथ देवगडे,सदस्य दिनेश बोरकुटे,सदस्य अॅड. राहुल नरूले, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी,प्रियंका आसुटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कवेश्वर लेनगुरे,सामाजिक कार्येकते जयंत जथाडे,सामाजिक कार्येकते,तनोज ढवगाये,क्षेत्र कार्यकर्ता,रविंद्र बडावार,क्षेत्र कार्यकर्ता,निलेश देशमुख, माहिती विश्लेषक, उज्वला नाकाडे, लेखापाल पुजा धमाले, सुशिला दुगा, यांनी शिबीरात योगदान दिले.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रेमीयुगलाने केली आत्महत्या..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विरोधकांचे काम टिका करण्याचे; आमचा एजेंडा विकासाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Comments are closed.