Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रातील सेमीकंडक्टर कारखाना गेला गुजरातेत.

आदित्य ठाकरे यांचे ट्विट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 13, सप्टेंबर :- महाराष्ट्रातील एक- एक कारखाने गुजरातेत नेले जात आहेत. आणि एक प्रकारे मुंबई- महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात आहे. असा आरोप केंद्र सरकारवर होत असतानाच ( चीप ) सेमीकंडक्टर निर्मितीचा सरकारी कारखाना सुद्धा आता केंद्र सरकार गुजरातेत नेत असल्याचा आरोप शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट द्वारे केला आहे.

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूला सेमीकंडक्टर(चीप) ची गरज असते हे ओळखून तत्कालीन मविआ सरकारने हा प्रकल्प राज्यात सुरू करण्याबाबत सर्वकाही प्रयत्न केले. आज संपूर्ण जगात चीप निर्मितीत तैवान आघाडीवर आहे. भारतात चीप निर्मितीचा एकही प्रकल्प नाही. त्यासाठी भारतात काम सुरू झाल्यावर या प्रकल्पासाठी वेदांत लिमिटेड कडून हालचाली सुरू झाल्या. महाराष्ट्रा सहित तेलंगणा, कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रात राखण्यास शिंदे-फडणवीस सरकार अयशस्वी ठरले असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

राजाराम खांदला येथील शेतकरी व आविस पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.