Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याने आजी- आजोबा समोरच दहा वर्षाच्या नातवाचा जीव घेतला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आजी-आजोबां सोबत शेतात असताना बिबट्याने झडप घालून उचलून नेल  स्वराजला . वन विभागाच्या पथकासह ग्रामस्थांनी शोध घेतला असता स्वराजचा झाडाझुडपात आढळला मृतदेह. आष्ठी तालुक्यातील  चार दिवसात बिबट्याने घेतला दुसरा बळी.. आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.

बीड २७ नोव्हेंबर : आजी_आजोबा शेतात गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील किन्ही येथे उघडकीस आली आहे .चार दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात वाघदरा शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज  दुसरी घटना उघडकीस आली असून स्वराज सुनील भापकर असे मृत मुलाचे नाव आहे. या घटने मुळे आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यां मार्फत  केले जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

किन्ही गावातील स्वराज सुनील भापकर हा शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आजी-आजोबांसोबत शेतात गेला असताना.झुंड़पात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून स्वराजला उचलून नेले. त्याच्या आजी-आजोबांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर इतर ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. मात्र कुठेच आढळून आला नाही . त्यानंतर वन विभागाच्या पथकासह ग्रामस्थांनी शोध घेतला असता स्वराजचा मृतदेह झाडाझुडपात पडलेला आढळून आल्याने आष्ठी तालुक्यात चार दिवसात बिबट्याने दुसरा बळी घेतल्याने मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. नरभक्षक बिबट्या खुलेआम तालुक्यात फिरत असताना वनविभाग दुर्लक्ष  असल्याचा आरोप  करून  नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.