Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आईचे प्रेम दुसऱ्याशी जुळले; संतापत मुलांनेच केले आईच्या प्रियकराचे अपहरण

सोळावर्षीय मुलाच्या आईचे प्रदीप सोबत अनैतिक संबंध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपुर, दि. २३ जानेवारी: अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने आईच्या प्रियकराचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना तहसील भागात उघडकीस आली. प्रियकर युवकाने वेळीच अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केल्याने मोठी घटना ठळली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून युवकाला अटक करीत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रदीप असे सुटका झालेल्या युवकाचे नाव आहे. पवन सुरेश कोराडकर 31 वर्ष असे अटकेतील युवकाचे नाव आहे सोळावर्षीय मुलाच्या आईचे प्रदीप सोबत अनैतिक संबंध आहेत. प्रदीप गांधी बागेतील एका कापडाच्या दुकानात काम करतो. तो वेळोवेळी मुलाच्या घरी येतो. तीन दिवसापूर्वी मुलाचा प्रदीप सोबत वाद झाला. पवन व अल्पवयीन १६ वर्षीय मुलाच्या साथीदाराने प्रदीपचे अपहरण करून त्याचा ‘गेम’ करण्याचा कट आखला. बुधवारी रात्री अल्पवयीन मुलगा, त्याच्या साथीदार व पवन दोन मोटारसायकलींनी प्रदीप च्या दुकानात आले. कामानिमित्त त्यांनी प्रदीपला दुकानाबाहेर बोलाविले. चाकूचा धाक दाखवून त्याला मोटरसायकल वर बसविले. तिघेही त्याला घेऊन जात होते. इतवारी परिसरात दोन पोलीस दिसताच प्रदीपने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.

मुलाच्या आईला फोन करून सुखरूप असल्याची माहिती दिली. दरम्यान दुकान मालकाने तहसील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध घेऊन दोघांना ताब्यात घेऊन पवन याला अटक केली. मुले प्रदीपला कुठे घेऊन जाणार होते, काय करणार होते? याचा तपास पोलीस करीत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.