Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

सातारा, दि. १३ सप्टेंबर :  सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्र आणि पाऊस आणि सांगली जिल्ह्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पाऊसामुळे कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

त्यामुळे दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कृष्णा आणि वारणा नद्यांमध्ये करण्यात येत आहे.कोयना धरणातून 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.तर दुसर्‍या बाजूला शिराळा तालुक्यातील चांदोली धरण 99.86 टक्के भरले आहे. त्यामुळे चांदोली धरणातुन सुरू असणारा विसर्ग वाढवून तो 8 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या वारणा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही हळूहळू वाढ होत आहे,मंगळवारी दुपारपर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी ही 20 ते 22 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे.

कोयना आणि चांदोली धरणातून सोडण्यात येणारे पाणी, त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे, यशोमती ठाकूर यांचे महालक्ष्मीला साकडे

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कडक कारवाई करा : डॉ. राजेंद्र शिंगणे

वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश

 

Comments are closed.