Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोसिखुर्द धरणात पाण्याची आवक सतत वाढल्यातच असल्यामुळे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघड़े

सलग तेराव्या दिवशी ही गोसिखुर्द धरणाचे दरवाजे उघड़े. आज दिवसभरात तीसऱ्यां बदलली स्थिति.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भंडारा, दि. १३ सप्टेंबर :  गोसिखुर्द पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्याने शिवाय नागपुर जिल्ह्याच्या कन्हान नदी व गोंदिया जिल्ह्यातील वाघ नदी दुथळी भरून वाहत असल्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातिल गोसिखुर्द धरनात पाण्याची आवक वाढली असून गोसिखुर्द धरन्याची पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी गोसिखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे अर्ध्या मिटर ने उघड़े करण्यात आले आहे.

ह्या दरवाज्यातून 3703.524 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे।विशेष म्हणजे सलग तेराव्या दिवशी ही भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातिल महत्वकांक्षी प्रकप गोसिखुर्द धरणाचे दरवाजे उघड़े असुन काल रात्रि 8 वाजता 21 दरवाजे उघड़े करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र दुपारनंतर संपूर्ण 33 दरवाजे उघण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी आलेल्या महापुराच्या धसका धरण प्रशासनाने घेतला असल्याने गोसिखुर्द धरणाच्या दरवाज्यांची उघड़-बंद स्थिति सुरु आहे।यामुळे नदी काठील गावाला सतर्क राहन्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे, यशोमती ठाकूर यांचे महालक्ष्मीला साकडे

कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ सुरू

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कडक कारवाई करा : डॉ. राजेंद्र शिंगणे

 

 

Comments are closed.