Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज एकही मृत्यु नाही, 22 कोरोनामुक्त तर 18 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि.15 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 18 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 1, भद्रावती 4, ब्रम्हपुरी 1, नागभीड 1, सिंदेवाही 0, मुल 1, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 1, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 882 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 201 झाली आहे. सध्या 148 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आतापर्यंत 5 लाख 87 हजार 531 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 98 हजार 755 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1533 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु; 966 आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध

गोंडवाना विद्यापीठ व माखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्यात सामंजस्य करार

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.