Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, २३ डिसेंबर :- थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने रात्रीच्या दरम्यान शेकोटी तसेच स्वयपाकासाठी  जंगलात जडावू सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने  हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना पोर्ला वनपरिक्षेत्रात उघडकीस आली आहे.  ताराबाई लोनबले (६५) रा. जेप्रा असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान देसाईगंज वन विभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रात येत असलेल्या दिभना गावालगतच्या जंगलात ताराबाई सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.

दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर अचानक हल्ला करून जंगलात फरफटत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

पोलीस- नक्षल चकमकीत दोन नक्षलचा खात्मा..गडचिरोली पोलिसाला मोठे यश..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.