Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस- नक्षल चकमकीत दोन नक्षलचा खात्मा..गडचिरोली पोलिसाला मोठे यश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 23, डिसेंबर :- गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दामरंचा जंगल परिसरात जहाल दोन नक्षल्यांना चकमकीदरम्यान खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. प्राप्त माहितीनुसार दामरंचा जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षल असल्याचे गुप्त माहिती होताच गडचिरोली पोलिस दल यांना माहिती होताच. छत्तीसगड राज्य पोलीस दल व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने संयुक्त सर्चिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते.

दरम्यान जंगलात आधीपासूनच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी सर्चिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.त्यावेळी नक्षल्याना पोलीसही जशास तसे प्रत्युत्तर दीले असता पोलीस विभागाचा वाढता दबाव पाहून नक्षल जंगलाचा आसरा घेत पसार झाले. त्यावेळी पोलिसांनी सर्चिंग ऑपरेशन करीत असताना दोन नक्षल्यांच्या मृतदेह आढळून आले असून साहित्यही प्राप्त झाले असल्याचे प्राथमिक आहे. या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षली जखमी झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आले असून पुन्हा नक्षल मृत पावले असतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.