विषारी दारू पिल्याने दोन जणांचा मृत्यू; तर ५ जण अत्यवस्थ
- सार्वतत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी एकाच वेळी अत्यवस्थ झाल्याने गावकरी चिंताग्रस्त
- निवडणुकी च्या दरम्यान दारू पाजल्याचा गावातील महिलांचा आरोप केल्याने पोलीस विभागात माजली खळबळ
- दारू विक्रेत्याला कोणाचा आधार? दारू घेणार्यांचा जिव टांगणीला लागला तरी पोलीस आहेत निद्रावस्थेत?
गडचिरोली दि २१ जानेवारी :- चामोर्शी तालुक्यात असलेल्या आणि आष्टी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या लक्ष्मणपूर येथे काल दिनांंक २० जानेवारी रोजी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक असल्याने विविध पक्षाच्या उमेदवारांकडून ग्रामीण भागातील नागरिकांंना आपलेसे करण्यासाठी चक्क गावातच प्लास्टिक कॅन मध्ये मोहफुलाची दारू आणल्याची सूत्राकडून माहिती आहे.
जस जसा निवडणुकीचा वेळ जात होता तस तसे दारू घेवून मतदान करण्याची रंगत वाढू लागली होती. अशातच सुरुवातीला दारू चे अतिजास्त सेवन झाले असेल म्हणून सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले. मात्र काही वेळातच ५ ते १० जनाची प्रकुर्ती खालावत गेली आणि लगेच आष्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्याची परिवारातील लगबग सुरु झाली आणि त्यातच रुग्णालयात नेत असतांंना वाटेतच एकजन दगावल्याची माहिती डॉक्टारांंनी खात्रीलायक माहिती दिली आहे. तर पुन्हा काही रुग्ण गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
त्यात अत्यवस्थ असल्याची प्रकुर्ती स्थिर असली तरी विषारी दारू पिल्याने २ जणांचा मृत्यू झाला आणि ५ जनांंना अत्यवस्थ झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये प्रकाश फकिरा गौरकार ५३, रमेश नानाजी ढूमने ५२ अशी मृतकाची नावे आहेत. तर यतील ५ जण अत्यवस्थ झाले होते. मात्र उपचारा दरम्यान सध्या सर्वांची प्रकुर्ती स्थिर असल्याची माहिती पोलीस विभागानी दिली आहे.
यामध्ये सामान्य रुग्णालय आष्टी येथे दाखल केलेल्या रुग्णाची नाव समोर आले आहेत. रमेश नानाजी ढूमने, बालाजी नारायण डवले, राजेश काशिनाथ गौरकर, श्यामराव काशिनाथ गौरकार, भगीरथ गोविंदा बट्टेे, गंगाधर नानाजी देवाडे, बापूजी गोविंदा नांदेकर, गंगाधर आनंदराव बोरकर, विनोद बबन वनपाखरे, गणेश सुरेश मडावी सर्व रा. लक्ष्मणपूर त. चामोर्शी तालुक्यातील आहेत. सध्या गावातील नागरिकांची प्रकुर्ती स्थिर असल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी दारू विक्रेत्या सोबतच पोलीसंनावर रोष व्यक्त केला आहे. दोन मृताकांच्या पोस्टमार्टम नंतरच अहवाल स्पष्ट होणार आहे.
Comments are closed.