Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओव्हरलोड तेंदूपत्ता बोदाची वाहतूक करणारा ट्रक आष्टी जवळील वैनगंगा नदीत कोसळून दोन ठार, तर एक जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: आलापल्ली वरून बल्लारपुर कडे तेंदूपत्ता बोदाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटून थेट आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर एक जण जखमी झाला आहे.

ही घटना रविवारी १३ जून च्या पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या  अपघातात ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव नितीन दीपक बिके (३२) , दुसऱ्या मृताचे नाव  कालु  सतविंदरसिंह सळुजा रा.किसाननगर. ता. सावली जि. चंद्रपूर असे आहे. तर  अजय अनिल कारेपणवार (३०) बल्लारपुर  हा जखमी आहे.

रविवारी पहाटे ३ च्या सुमारास आलापल्ली कडून बल्लारपुर कडे हरमन ट्रान्सपोर्ट बल्लारपूर च्या मालकीचा  ट्रक क्रमांक MH34 BG-6111 तेंदूपत्ता बोद घेऊन जात असताना ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून थेट खाली नदीपात्रात कोसळला ह्यात ट्रक चालक व क्लिनर चा  जागीच मृत्यू झाला. तर  एक जखमी झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

ट्रक मध्ये तेंदूपत्ता बोद ओव्हरलोड झाल्याने ट्रक चालकाचे वाहनांवर संतुलन बिघडले असे अपघातात जखमी झालेल्या  इसमाने  पोलिसांकडे दिलेल्या बयानात सांगितले आहे.

आष्टी पोलीस स्टेशन येथील PSI वैशाली कांबळे यांच्या तत्परतेने जखमी इसमाला  आष्टी  येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास आष्टी पोलीस करत आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! काकाचे मुंडक दिले नाही म्हणून १५ वर्षीय निर्दोष बालकाची निर्घुण हत्या!

मनुष्यवस्तीत शिरला मध्यरात्री बिबट्या; बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.