Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गॅस सिलिंडरच्या स्फोटात तरुण वकिलाचा दुर्दैवी मृत्यू…

देह छिन्न विच्छिन्न स्थितीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जालना 03, सप्टेंबर :- गॅसच्या स्फोटात एका वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील अंबड चौफुली भागातील अर्चना नगरमध्ये गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.यात ऍड. किरण लोखंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. किरण लोखंडे यांचा विवाह ३ महिन्यापूर्वी झाला होता.

परवा गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक घरातील गॅसची गळती सुरू झाली . त्यावेळी किरण यांची पत्नी घराबाहेर बसलेली होती. गॅसची गळती होतेय हे लक्षात येताच किरण हे गॅस गळती कोठून होतेय हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळी अचानकच स्फोट होऊन त्यात किरण यांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका भयानक होता की किरण लोखंडे यांचा मृतदेह छिन्नविछीन्न झाला.
स्फोटाचा प्रचंड आवाज परिसरात झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे धाव तातडीने घेतली. आणि पोलिसांना व अग्निशामक दलाला त्वरित पाचारण केले. अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले . त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
ऍड. किरण लोखंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे नववधुवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे.त्यांच्या पश्चात त्यांचे आई,वडील,पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे.ऐन सणाच्या तोंडावरच या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ॲड.किरण अनिल लोखंडे हे जालना येथे वकिली करीत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

पोलीस भरतीच्या नावाने तरुणांची फसवणूक !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“या” गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन मागे, पण समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा ! 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.