Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची अभूतपूर्व कामगिरी.

आरोपींना मुद्धे मालासह अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती, 03, सप्टेंबर :- जिल्ह्यात गांजा/कॅनाबिस स्थानिक गुन्हे शाखा कारवाईत अग्रेसर असतांना पुन्हा एकदा अंमली पदार्थांची अवैध वाहतूक सुरू झाली आहे.गांजा वाहतूक करीत असताना स्थानिक ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ४ आरोपीसह ३ वाहने आणि ४३५.०५० किलोग्राम गांजा पकडून चांदूर रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

२ सप्टेंबर रोजी चांदूर रेल्वे परिसरात पेट्रोलिंग करत असताना आंध्रप्रदेशातून पांढरकवडा-यवतमाळ – बाभूळगाव-चांदूर रेल्वे मार्गे अमरावती येथे गांज्याची वाहतूक ट्रक मधून करत असून त्यांच्या बाजूला दोन चार चाकी वाहने राहत असल्याची खबर स्थानिक गुन्हे तपास शाखेला लागली. खबर मिळताच स्वतः पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी जातीने हजर राहून वरिष्ठांच्या परवानगीने चांदूर रेल्वे ते अमरावती रोड वरील मालखेड गार्डन फाट्याजवळ न्यू बादल हॉटेल समोर नाकाबंदी करून मुद्दे मालासहित आरोपींना अटक केली. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी हे करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कारवाईत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव,उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे जितेंद्र जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या निरीक्षणाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार,पोलीस अंमलदार संतोष मुदाने, रवींद्र बावणे,बलवन्त दाभने,पंकज फाटे, दिनेश कनोजिया,मूलचंद बाभुरकर,मोहन मोरे, अमोल देशमुख,प्रशांत ढोके,दीपक सोनाळेकर,विलास रोकडे, निलेश डांगोरे,नितीन कलमकर, प्रमोद शिरसाट, सायबर सेलच्या सरिता चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गॅस सिलिंडरच्या स्फोटात तरुण वकिलाचा दुर्दैवी मृत्यू…

पोलीस भरतीच्या नावाने तरुणांची फसवणूक !

Comments are closed.