Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मूलचेरा कोविड सेंटर ला उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी भेट देऊन केली पाहणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुलचेरा, दिनांक २६ एप्रिल: औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलचेरा येथे प्रशासनच्या वतीने कोविड केंद्राची स्थापना करण्यात आली.
२६ एप्रिल २०२१ रोजी डाँ. विजय सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी मुलचेरा,तहसीलदार कपिल हटकर यांनी तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कोविड केंद्राची भेट घेतली.
केंद्राची पाहणी करण्यात आली व केंद्रात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. त्यांनतर डाँ. ललित मलिक तालुका वैद्यकिय अधिक्षक व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली.
या प्रसंगी राजेंद्र तलांडे नायब तहसीलदार मुलचेरा,डाँ धाकडे,केंद्रातील परिचारिका,आरोग्य कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.