Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमित शहांचा आजचा दौरा गणेश दर्शन का राजकिय मुंबईमिशन ?

भाजपा-मनसे युतीचे संकेत...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 05, सप्टेंबर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. श्रीगणेशाचे दर्शन घेता-घेता आपले राजकीय मिशन यशस्वी करण्यासाठी अमित शहांचे प्रयत्न राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या या मुंबई दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर मुंबईला शहा यांची प्रथमच भेट आहे. त्यादृष्टीने ते मनसे सोबत मुंबई महानगरपालिकेत युती करण्याची चाचपणी देखील करणार आहेत.

अमित शाह यांनी मुंबईतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. शाह यांनी कुटुंबियांसह लालबागचा राजा, वांद्रे येथील आशिष शेलारांच्या गणेशाचं दर्शन घेतले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणेश दर्शनासाठी गेले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मनसे युतीवर शिक्कामोर्तब ?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा-मनसे युतीची चर्चा सुरू आहे. अमित शाह यांच्यासोबत आज भाजपा नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी रणनीती बनवली जाण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने मनसेसोबत युती झाल्यास काय फायदा आणि काय तोटा होऊ शकतो यावर चर्चा होईल. उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर भाजपानं राज ठाकरेंना जवळ करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत मराठी मतदारांना आपलसं करण्यासाठी राज ठाकरेंची मनसे भाजपाला हवी आहे. मुंबईत राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. लाखोंच्या सभा राज ठाकरे सहज घेऊ शकतात. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपासोबत कसं सामावून घेता येईल यावर बैठकीत चर्चा होऊ शकते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

शेकापचा दणका : गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.