Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्राच्या लेकीचा थेट दिल्लीला सन्मान; मिस अँड मिसेस डायडम स्पर्धेत २ पुरस्काराने सन्मानित

पनवेलकरांची उंचावली मान...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पनवेल, दि. २८ डिसेंबर : महाराष्ट्रातील पनवेलमधील हर्षला योगेश तांबोळी  यांना मिस अँड मिसेस डायडम इंडिया लेगसी २०२१ या स्पर्धेत हर्षदाला पीपल्स चॉईस आणि ब्युटी विथ पर्पज या दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  यामुळे महाराष्ट्रातील पनवेलमधील हर्षला योगेश तांबोळी यांनी पनवेलकरांचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशाची राजधानी दिल्ली येथे मिस अँड मिसेस डायडम इंडिया लेगसी २०२१ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून केवळ ४ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. देशभरातील अनेक महिलांनी या मानाच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. याच स्पर्धेत आपल्या मातीतील हर्षला योगेश तांबोळी यांनी एक नाही तर २ पुरस्कार जिंकत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे.

मिस अँड मिसेस डायडम इंडिया लेगसी २०२१ ही स्पर्धा केवळ सौंदर्याची नव्हती तर या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनी सामाजिक जीवन जगत असताना महिलांना उद्भवणाऱ्या समस्या व त्या समस्या सोडवण्यासाठी आपण केलेले प्रयत्न यावर आधारित होता. हर्षदा तांबोळी यांना समाजसेवेची प्रचंड आवड असल्याने खेडोपाड्यातील महिलांना होणाऱ्या समस्या व त्या सोडवण्यासाठी सॅनिटरी पॅड चे वाटप तसेच इतर सामाजिक उपक्रम राबविल्याने त्यांना या मानाच्या स्पर्धेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत नागरिकांनी दिलेली साथ प्रेरणादायी असून यापुढे देखील आपले समाजकार्य हे असेच चालू राहील अशी प्रतिक्रिया हर्षदा योगेश तांबोळी यांनी यावेळी व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

राखीव वनांमध्ये असलेल्या नागरिकांचे अवैध अतिक्रमण वनविभागाने हटविले

“त्या” दोन अवैध अतिक्रमित धारकांचे वन्यजीव विभागाने काढले अतिक्रमण!

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.