Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड काल (सोमवारी) राज्याच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्याने अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याने आता चिंता वाढली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड आपल्या ट्वीटमध्ये ट्विटमध्ये म्हणाल्या की,  “मला आज सकाळी कळलं की माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांना खबरदारी घेण्याची विनंती करते.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत ३५ जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून २ हजार ३०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान, वेगानं वाढणारे कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेले के. सी. पाडवी यांच्याही नावाचा समावेश आहे. गेल्या २ दिवसांत एकूण ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २ दिवसांत २ हजार ३०० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, ३ पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशातच आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

राज्यातली करोनाची परिस्थिती काय?

राज्यात काल कोरोनाच्या १,४२६ नव्या बाधितांची नोंद झाली. तर ७७६ रूग्ण करोनामुक्त झाले. राज्याचा रूग्ण बरे होण्याचा दर ९७.६६ टक्के झाला आहे. काल कोविडमुळे राज्यात २१ रूग्णांच्या मृत्युची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात काल दिवसभरात २६ नव्या ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. त्यात मुंबईत ११ नवे रूग्ण तर रायगडमध्ये ५, ठाणे पालिकेत ४ रूग्ण, नांदेडमध्ये २ रूग्ण आणि नागपूर, पालघर, भिवंडी, निजामपूर महापालिका आणि पुणे ग्रामीण या भागांमध्ये प्रत्येकी एका ओमायक्रॉन बाधित रूग्णाची नोंद झाली आहे.

हे देखील वाचा  :

“त्या” दोन अवैध अतिक्रमित धारकांचे वन्यजीव विभागाने काढले अतिक्रमण!

राखीव वनांमध्ये असलेल्या नागरिकांचे अवैध अतिक्रमण वनविभागाने हटविले

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

 

 

Comments are closed.