Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एका दहशतवाद्याचा खात्मा !

भारतीय लष्कराची जम्मू काश्मीर मध्ये अभूतपूर्व कामगिरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जम्मू, 26, ऑक्टोबर :-  जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात वारंवार चकमकी सुरूच असतात. भारतीय जवान डोळ्यात तेल घालून भारतीय सीमांचे रक्षण करीत आहेत. त्यातही दहशतवादीशी लढण्यात भारतीय लष्कराची शक्ति खर्च होत आहे. अशाच एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

काश्मीर – जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या एका गटामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. येथील कुपवाडा जवळील नियंत्रण रेषेवर सुदपोरा येथे घडलेल्या या घटनेनंतर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून अधिक दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरु असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याबाबत अधिक माहिती अशी, कुपवाडा येथील नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी (दि. २५) रात्री काही दहशतवादी अमली पदार्थांसह घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या एका तुकडीला मिळाली. यानुसार तुकडीने जोरदार मोहीम राबवली, या दरम्यान मध्यरात्री दहशतवादी आणि सैनिकांमध्ये जोरदार चकमक झाली. या गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार झाला तर इतर दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके रायफल, एक पिस्तुल जप्त करण्यात आली असून हे दहशतवादी एलईटी गटाचे असल्याचा संशय आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्री शिंदे घेणार अयोध्येत रामलल्लाचं दर्शन

धोनीच्या प्राॅडक्शन हाउसचा पहिला सिनेमा तामिळ भाषेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.