Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

मुख्यमंत्री सुरक्षित..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई ,दि.५ जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाला मुंबई महापालिका मुख्यालयानजीक अपघात झाला.या अपघातामध्ये दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षित असून इतर कोणालाही इजा झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे.

मुंबईसह कोकण आणि राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी हे मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देण्यासाठी जात होते. त्याच सुमारास संध्याकाळी मुख्यमत्र्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. यावेळी मुख्यमत्र्यांची गाडी पोलिसांच्या वाहनापुढेच थांबलेली होती. परंतु या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.