Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. ८ ऑगस्ट :  शिक्षण प्रत्यक्ष अनुभवाने अधिक समृध्द होत असते मात्र त्यासाठी समाजासाठी आपल्या शिक्षणाचा आणि संशोधनाचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन असल्याने प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला तसेच विद्यापीठाच्या ग्रीष्मकालील आंतरवासियता उपक्रम पूर्ण केलेल्या नागपूर विभागातील निवडक विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सामंजस्य करार प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्रति कुलगुरु डॉ. श्रीराम कावडे, आरोग्यचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, गोंडवानाचे कुलसचिव अनिल हिरेकन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, समाजातील तळागाळातील लोकांपर्यत संशोधन पोहचणे गरजेचे आहे. या उपक्रमाकरीता विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे विविध कल्याणकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाकरीता विद्यार्थ्यांचा प्रतिसाठ मोठया प्रमाणात आहे. दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्याचा सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच विद्यार्थ्यांना समाजातील लोकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेता याव्यात यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध पध्दती शोधण्यात याव्यात. गोंडवाना विद्यापीठासमवेत करण्यात आलेला सामंजस्य करार संशोधन व आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. या प्रकल्पासाठी विविध आराखडे तयार करण्यात आले असून त्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु व त्याच्या सहकारी यांचे कार्य महत्वपूर्ण आहे. आरोग्य विद्यापीठाचा हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होईल असे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकरे यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकास आरोग्य व शिक्षण गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. दूर्गम भागातील लोकांना किमान सुविधा मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आरोग्य विद्यापीठासमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आरोग्य विषयक समस्या निराकरण करणे अधिक सुलभ होईल. आपण सामाजिक साखळीतील घटक आहोत यासंकल्पनेतून सामाजिक कर्तव्य समर्थपणे पेलणे गरजचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्रति-कुलुगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन त्यांनी शिक्षणाबरोबर इंटरशिपच्या माध्यमातून सामाजिक समस्यांकडे लक्ष द्यावे असे सांगितले. गोंडवाना विद्यापीठासमवेत करण्यात आलेला सामंजस्य करार सामाजातील आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असेही त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

CWG 2022 पी. व्ही. सिंधूचा ‘गोल्डन’ स्मॅॅश, भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक

जिल्हयात 2.98 लक्ष घरांवर तिरंगा फडकणार.

संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड जेलमध्ये

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.