Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संतापजनक! तब्बल चार वर्षा पासून पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन ठेवले डांबून… अंगावर गंभीर जखमा

गेल्या पंधरा वर्षांपासून जिवंत महिलेला कोंडून ठेवले.. माणूस नाहीं तो राक्षस आहे - शेजारच्या संताप बीड शहरातील नात्याला काळीमा फासणारी घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. ११ एप्रिल : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चार वर्षा पासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महिलेला मारहाण देखील केलेली आहे. तसेच दोन मुलं देखिल दहशतीखाली आहे. घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची आज सामाजिक कार्यकर्ते पोलीस आणि पत्रकार यांनी सुटका केली यावेळी त्या महिलेची अवस्था पाहून अक्षरशः सामाजिक कार्यकर्त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले.

 गेल्या पंधरा वर्षापासून हा अमानुष अत्याचार आणि नरक यातना भोगणाऱ्या पिडतेची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीड शहरातील रूपाली किन्हिकर या महिलेच्या वाट्याला जे आलं ते ऐकून आणि पाहून अक्षरशः पायाखालची जमीन सरकली.. बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हिकर या महिलेचां 20 वर्षांपूर्वी मनोज श्रीमंत असलेल्या घरांमध्ये विवाह झाला.. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली मात्र सुरुवातीच्या दोन-तीन वर्ष आनंदात गेले त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली.

एका दुकानावर कामाला जात होती मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने ते देखील बंद झालं गेल्या 17 वर्षांपासून मला बाहेर जाऊ देत नाहीत संशय घेतात पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते त्यानंतर आज बाहेर निघाले माझी मुलं आहेत.. मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात देत मारहाण देखील करत असल्यास पीडित महिलेला सांगितले यावेळी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

जिल्हास्तरावर स्वयंसेवी संस्थानी पाणी व्यवस्थापन आराखडे तयार करावेत : डॉ नीलम गोऱ्हे

धक्कादायक! पोलीस जावयाकडून सासऱ्याची हत्या; मारहाणीत पत्नी गंभीर

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.