Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटी लवकरच पूर्ववत होणार; मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब यांच्या घरावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल यावेळी घेण्यात आली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेही मंत्री, ॲड.परब यांनी सांगितले. त्यांच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप बघून शिस्त व आवेदन पद्धतीनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई, दि. 11 एप्रिल : कोविड महामारीमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती, त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी दिलासादायक माहिती परिहवन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माननीय उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल, 2022 पर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरु होण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीनंतर मंत्री, ॲड. परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संपामुळे गेले 5 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. तसेच कोविड आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे कोविडपूर्व काळात जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात करीत पुन्हा एसटी नव्या दमाने सुरु करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित

महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ- आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

 

 

Comments are closed.