Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज पाटील याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत दिल्या शुभेच्छा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

मुंबई, दि. 11 एप्रिल : ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पृथ्वीराजचे अभिनंदन करुन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली, तसंच त्याला कुस्ती कारकिर्दीतील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघाने आयोजित केलेल्या ६४ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत
‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम स्पर्धेत पृथ्वीराजने लढाऊ वृत्तीने विजय मिळवला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याचा पृथ्वीराज पाटील सैन्यदलात सेवा करीत आहे. त्याने जिंकलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढणारा आहे. पृथ्वीराज सारखे नव्या दमाचे पैलवान महाराष्ट्राच्या कुस्तीची गौरवशाली परंपरा पुढे नेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ- आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

जिल्हास्तरावर स्वयंसेवी संस्थानी पाणी व्यवस्थापन आराखडे तयार करावेत : डॉ नीलम गोऱ्हे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित

 

 

Comments are closed.