Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हास्तरावर स्वयंसेवी संस्थानी पाणी व्यवस्थापन आराखडे तयार करावेत : डॉ नीलम गोऱ्हे

कोरो इंडिया संस्थेच्या परिषदेत व्यक्त केले मत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ११ एप्रिल : पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात कोरो इंडियाने केलेले काम हे इतरांना प्रेरक आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आणि सामान्य कार्यकर्ते यांना पाणी प्रश्नावर एकत्रित काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. राज्यामध्ये गरजू तालुक्यांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्याबाबत विधानपरिषदेतही अनेकदा चर्चा झाली आहे. काही वेळा राजकिय हस्तक्षेपामुळे प्रत्यक्षात पाणी वाटपात असमतोल दिसून येतो. मात्र कोरो इंडियासारख्या स्वयंसेवी संस्थानी या पुढील काळात जिल्हा स्तरावरील पाणी वाटप आराखडे तयार करण्यास शासनाला मदत करावी. यामुळे ग्रामीण जनतेला पाणी प्रश्नावर दिलासा मिळू शकेल, असे मत विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित लोकसहभागी पाणी व्यवस्थापन प्रक्रिया या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थित २४ संघटनाच्या वतीने पाणी प्रश्नावर डॉ गोऱ्हे यांना निवेदन देण्यात आले. तसेच जलनायिका या पुस्तकाचे प्रकाशन आणि लघुपटाचे लोकार्पण यावेळी यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्या म्हणाल्या, कोणत्याही प्रश्नावर एकत्रित येवून मार्ग काढणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. यानुसार आज ग्रामीण भागातील महिलांना सामजिक काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठी या संस्थेने केलेली मेहनत महत्वाची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रश्न व आपत्ती व्यवस्थापन याबाबत एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात विभागीय आयूक्त स्तरावर एक बैठक बोलवली आहे. यामुळे काही प्रश्नावर उपाय शोधणे शक्य होईल.

परिसंवादामध्ये पाणी प्रश्नावर काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते संपत पवार, ॲक्वाडॅम संस्थेच्या उमा कालेकर, जलसंपदा विभागाचे सहसचिव संजय तातू यांनी सहभाग घेतला. सातारा जिल्ह्यातील सहभागी महिला मेधा ढोंबे, सुरेखा काळेल यानी आपले अनुभव मांडले. सूत्रसंचालन मुमताज शेख यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमाचे आयोजन कोरो इंडिया तर्फे सुजाता खांडेकर, सुप्रिया सोनार आणि २४ स्वयंसेवी संस्थानी मिळून केले.

हे देखील वाचा : 

महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ- आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

धक्कादायक! पोलीस जावयाकडून सासऱ्याची हत्या; मारहाणीत पत्नी गंभीर

 

Comments are closed.