Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिनांक 25 एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि 25 एप्रिल: 25 एप्रिल हा दिवस हिवताप दिन म्हणुन साजरा करण्याकरीता जिल्हा हिवताप कार्यालाय गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम इंदिरा गांधी चौकातील विधाम गृह गडचिरोली येथून, प्रशिक्षण केंद्राच्या शिकाबू परिचारीका विदयार्थीनी, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांची प्रभात फेरी ब्दारे गावातील चौका-चौका मधून फेरी काडून, हिवताप विषयक घोषवाक्याच्या निनादात फेरी काढून महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे फेरी विसर्जीत करुन सभेचे
आयोजन करण्यात आले.

महिला व बाल रुग्णालयातील सभागृहामध्ये जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून सभेचे आयोजन करण्यात आले. सभाध्यक्ष म्हणून मा.डॉ.दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली, प्रमुख अतिथी मा ,डॉ ,अनिल रुडे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली, मा.डॉ.दिपचंद सोयाम बैद्यकिय अधिक्षक महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, मा.डॉ.जठार सहा जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली, मा डॉ, सुनिल मडावी अतीरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली, मा. डॉ. समिर बन्सोडे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी गडचिरोली, मा.डॉ.पंकज हेमके नोडल ऑफिसर जि.प.गडचिरोली, मा.डॉ.कुणाल मोडक जिल्हा हिवताप
अधिकारी गडचिरोली मंचावर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्वप्रथम हिवतापाचे जनक सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलीत करून सभेची सुरुवात करण्यात आली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुनाल मोडक यांनी प्रास्ताविकातून हिवतापाचा पार्श्वकालीन इतिहासाची
माहिती सांगून अतिप्राचीन वैदिक काळात हिवतापाचा उल्लेख “सर्व रोगाचा राजा” असल्याचे सांगितले डॉ रोनाल्ड रॉस यांनी हिवताप हा डासांमार्फत पसरणारा आजार आहे असे संशोधन केले व त्यानंतर खऱ्या अर्थाने हिवताप नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात झाल्याचे सांगितले. प्रसाराबाबतची माहिती आणि घ्यावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतची विस्तृत माहिती सांगून जिल्हयाची हिवतापाबाबतची आकडेवारी सुध्दा सांगितली.

महीला व बालकाची हिवताराच्या बाबतीत घ्यावयाच्या काळजीबाबत डॉ. दिपचंद्र सोयाम वैद्यकीय अधिक्षक नहीला व बाल रुग्णालय गडचिरोली यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. अनिल रुडे जिल्हा शल्यचिकीत्मक सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी हिवतापाबाबत दिरंगाई न करता वेळीच उपचार घेतल्यास जिवीतहानी टाळता येऊ शकते आणि ज्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सभाध्यक्ष व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल गाढवे यांनी यावर्षीचे घोषवाक्य “हिवताप रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी व लोचचे प्राण वाचविण्यासाठी नविन संकल्यनाचा वापर करणे” यावर मार्गदर्शन केले. नियमित प्रतिबंधात्मक उपाययोजने देरीज नवनविन कल्पना कर्मचाऱ्यांनी या कामी वापरण्यास सांगितले. तसेच राष्ट्रीय जंत विरोधी दिवसाचे महत्व सांगुन रागिी 6 महिण्यातून एकदा जंत बिरोधी औषधीचे सेवन करावे असे सांगितले.

वर्षभरात हिवताप कार्यक्रमाअंतर्गत विशेष उल्लेखनिय काम केलेले कर्मचारी वैशाली रामदास मोगरे आशा, लाहेरी प्रा.आ.केंद्र लाहेरी, परशुराम डुब्बलबार, क्षेत्र कार्यकर्ता, जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली, सुरेखा धुढले, हंगामी वरीष्ट क्षेत्र कार्यकर्ती ग्रा.रुग्णा, भामरागड. विक्रम दडमल, आरोग्य सेवक उपकेंद्र बेरकड, प्रा.आ.केंड नुरुमगाव, विजय मुलकलवार, आरोग्य सहाय्यक प्रा.आ.केंद्र गट्टा. अशोक एडलाबार, आरोग्य पर्यवेक्षक पं.स.अहेरी. पद्माकर घोरमाडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रा.आ.केंद्र कोटगूल, संकेत बेगलोपवार मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय अहेरी, राजेश आर, कार्लेकर, जिल्हा व्ही,बी.
डी.सल्लागार जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली. यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

सभेचे सुत्र संचालन राजेश कार्लेकर यानी केले. तसेच आभार प्रदर्शन तारकेश्वर अंबादे आरोग्य सहाय्यक जिल्हा
हिवताप कार्यालय, गडचिरोली यानी केले. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर/अधिकारी बंद कार्यक्रमानंतर गडचिरोली शहरातील कारमेल हायस्कूल येथील सभेस उपस्थित होवून जागतिक हिवताप दिनाविषयी मार्गदर्शन केले.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू तर सहकारी शिक्षक गंभीर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.