Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू तर सहकारी शिक्षक गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, दि. २५ एप्रिल : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने खासगी आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ठार, तर सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळ च्या ११:०० सुमारास आलापल्ली- भामरागड मार्गावरील मिरकल फाट्यावर घडली. 

अपघातात मृत झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव किशोर मद्देर्लावार(५३) आहे तर जखमी असलेल्या सहकारी शिक्षकाचे नाव रमेश गौरकर(५०) असे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मद्देर्लावार व गौरकर हे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजे धर्मराव शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित मन्नेराजाराम येथील राजे धर्मराव आश्रमशाळेत कार्यरत होते. शाळेचे ऑडिट असल्याने दोघेही मोटारसायकलने मन्नेराजाराम गावाकडे जात होते. मिरकल फाट्यावर पोहचताच समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मुख्याध्यापक किशोर मद्देर्लावार जागीच ठार झाले, तर रमेश गौरकर गंभीर जखमी झाले.

गौरकर यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला रवाना करण्यात आले आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनेची माहिती आलापली परिसरात माहिती होताच सर्वत्र शोकाकुल वातावरण असून मृत झालेल्या मुख्याध्यापकांची पत्नी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत

 

Comments are closed.