Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. २५ एप्रिल : माजी राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तैनात असलेल्या पोलीस जवानांने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. 

आज रोज सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अहेरी येथील ‘रुक्मिणी महल’ या अंब्रिशराव यांच्या बंगल्याच्या परिसरात घडली असल्याने एकच खळबळ उडाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृत पोलीस जवानांचे हितेश भैसारे ( ३७) नाव असून ते अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कार्यरत होते. 

रुक्मिणी महल येथे कर्तव्य बजावीत असताना कौटुंबिक कलहातून स्वतःवर गोळी झाडून जागीच कोसळून मृत झाले असून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.