Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “बि- बियाणे, फळझाड रोपे व कृषी साहित्य वाटप” कार्यक्रम संपन्न

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २५ ऑगस्ट :   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्याने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन दि. 25/08/2022 रोजी गडचिरोली पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र/कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सोनापूर, गडचिरोेली यांचे संयुक्त विद्यमाने ‘भव्य कृषी मेळावा’ पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला.

यावेळी दुर्गम-अतिदुर्गम भागातील 600 शेतकरी उपस्थित होते. 101 बचत गटांना प्रत्येकी एक याप्रमाणे 101 स्प्रेअर पंप, 08 शेतक­यांना चिखलणी यंत्र, 225 शेतक­यांना प्रत्येकी 10 किलो याप्रमाणे एकुण 2250 किलो धान बियाणे, 10 शेतक­यांना प्रत्येकी 10 किलो याप्रमाणे 100 किलो सोयाबिन बियाणे, 100 शेतक­यांना प्रत्येकी 10 याप्रमाणे 1000 चिकू, फणस, लिंबु, काजु इ. फळझाड रोपे, 50 शेतक­यांना प्रत्येकी 15 याप्रमाणे कुक्कुट पक्षी वाटप करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आतापर्यंत कृषी विज्ञान केंद्र, तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट कृषी समृध्दी अंतर्गत 11,633 शेतक­यांना कृषी बियाणे, 444 शेतक­यांना कुक्कुटपालन प्रशिक्षण देवून कुक्कुट पक्षी व खाद्य व भांडी, 100 शेतक­यांना बदकपालन प्रशिक्षण देवून बदक पक्षी खाद्य व भांडी, 440 शेतक­यांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण व बियाणे किट, 87 शेतक­यांना मत्स्य पालन प्रशिक्षण मत्स्य बीज व खाद्य, 32 शेतक­यांना मधुमक्षीकापालन प्रशिक्षण, 170 शेतक­यांना कृषी दर्शन सहल, 80 शेतक­यांना शेळी पालन प्रशिक्षण, 500 शेतक­यांना शेवगा लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी 30 रोपे, 500 शेतक­यांना पपई लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी 30 रोपे, 500 शेतक­यांना सिताफळ लागवड प्रशिक्षण देवून प्रत्येकी 30 रोपे वाटप करण्यात आले. तसेच 2023 शेतक­यांचे महाडिबीटीमध्ये ऑनलाईन फार्म भरून काटेरी तार योजना, विहीर सिंचन योजना, आधुनिक शेती अवजार योजना, कृषी स्वावलंबन योजना, पीक विमा योजना, पशु संवर्धन योजना इत्यादीचा लाभ मिळवून दिला. 6092 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत फार्म भरून लाभ मिळवून देण्यात आला. असे एकुण 23,061 शेतक­यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

याप्रसंगी उपस्थित शेतक­यांना जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी आपले मार्गदर्शनात सांगितले की, गडचिरोली पोलीस दलाचा पोलीस दादालोरा खिडकी हा उपक्रम कौतुकास्पद असून, आतापर्यंत 2 लाख नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस दलाचे जिल्ह्राच्या विकासात भरीव योगदान मिळालेले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्रातील नागरिकांनी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत योजनांचा लाभ घेवून आत्मनिर्भर व्हावे असे सांगितले तसेच पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी गडचिरोली जिल्हयातील शेतकरी व इतर जनतेनी गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले तसेच नक्षलवाद्यांच्या खोट¬ा चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधावा. गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले.

यावेळी कृषी मेळाव्यास मा. जिल्हाधिकारी संजय मिणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे तसेच कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सोनापूर, विषय विशेषतज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशाळा) विक्रम कदम, विषय विशेषतज्ञ (कृषी हवामान शास्त्र) बुध्दावार, कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली श्रीमती शितल खोबरागडे हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा : 

‘महाराष्ट्र शासन’ पाटी वाहनांवर लावून फिरणाऱ्या तोतयांवर आरटीओ करणार कारवाई

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.