Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोल्हापुरात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के

भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट : गेल्या काही दिवसात देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. २५ आणि २६ ऑगस्टच्या रात्री जम्मू-काश्मीरपासून ते महाराष्ट्रापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भारताबाहेर म्हणजे अफगाणिस्तानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर किंवा अफगाणिस्तान या कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाही.

कोल्हापुरात मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री जवळपास सव्वा दोनच्या सुमारास कोल्हापुरात भूकंपाच्या धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती.  नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, कोल्हापुरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले.  रात्री २.२१ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ ,इतकी मोजण्यात आली. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही, असं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून सांगण्यात आलं आहे. भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती, असंही सांगण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोल्हापुराती भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे? याबाबत अद्याप सविस्तर माहिती कळू शकलेली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भूकंपानं कुठलीही हानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये मात्र काहीसं भीतीचं वातावरण आहे. त्याआधीही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के जाणवले होते. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. जिल्हा प्रशासनाकडून घाबरुन न जाण्याचं आवाहन देखील करण्यात आलं होतं.

जम्मू काश्मीरमध्ये देखील भूकंप

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तिकडे, जम्मू काश्मीरमध्ये देखील भूकंप झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ३.२८ वाजता जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून ६२ किमी अंतरावर ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 

“त्या” दोन मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

 

Comments are closed.