Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला डॉक्टरांच्या आत्महत्तेने नांदेड शहरात खळबळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नांदेड, दि. २५ मार्च : नांदेड रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या पंजाब लॉजमध्ये गळा आणि हात चिरलेल्या अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिला डॉक्टर चा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नांदेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृत महिला डॉक्टर असून ती नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी आहे. दरम्यान सदर महिला २३ मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार भोकर पोलिसांत देण्यात आली होती. त्यानंतर आता तिचा मृतदेह आढळून आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान लॉजमधील ज्या रूममध्ये सदर महिलेचा मृतदेह आढळला ती रूम आतून बंद करण्यात आली होती. तर मृत महिलेच्या गळ्यावर आणि हातावर कटरने जखमा केल्या होत्या. कटर मृत महिलेच्या हातात असल्याने ही आत्महत्या असल्याची प्राथमिक माहिती वजीराबाद पोलिसांनी दिली आहे. पण मृत महिलेच्या लॉजमधील रूममध्ये मिळालेले दोरी, विविध औषध, कटर हे साहित्य आणि मृतदेहावरील जखमा यामुळे या घटने विषयी संशय व्यक्त केला जात आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे – मंत्री, ॲड. अनिल परब यांचे एसटीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन

वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बेधुंद कारभारामुळे शिरना नदी चे पात्रच दुभंगत असल्याने नवे संकट समोर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महायुवा” ॲपचे अनावरण

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.